कारेमोरे, ठाकरे, धोपटे, उईके यांची निवडणुक रिंगणातून माघार
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

कारेमोरे, ठाकरे, धोपटे, उईके यांची निवडणुक रिंगणातून माघार
– आपआपले उमेदवारी अर्ज घेतले मागे
– महायुतीतील पुष्कळशा अडचनी निपटल्या, आघाडीत कायम
*रामटेक* -:
निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज ४ नोव्हेंबरची अखेरची तारीख निवडणुक विभागातर्फे देण्यात आली होती. त्यानुसार रमेश कारेमोरे, नरेश धोपटे, राजेश ठाकरे, हरीष उईके यांचेसह आणखी तिन उमेदवारांनी आज ४ नोव्हेंबर ला निवडणुक रिंगणातून माघार घेत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी निवडणुक विभागाने ४ नोव्हेंबरच्या दुपारी ३ वाजता पर्यंतची वेळ ठेवलेली होती. तेव्हा गेल्या दोन तिन दिवसांपासुन गल्लीबोळातील चावडीवर विविध चर्चांना उधान आले होते. कारण रामटेक विधानसभेत महायुतीसह महाविकास आघाडीत फुट पडल्याने येथील दिग्गज व राजकारणात रंगलेल्या नेत्यांना हिवाळ्याच्या थंडीतही घाम फुटला होता हे तेवढेच खरे आहे. ४ नोव्हेंबरच्या ३ वाजतापर्यंत कुणीही काहीच बोलायला तयार नव्हते. फुटीच्या राजकारणाची ही गुंतागुंत भल्याभल्यांनाही सोडविणे कठीण झाले होते, मात्र आज ४ नोव्हेंबर ला विशेषतः रमेश कारेमोरे, नरेश धोपटे, राजेश ठाकरे, हरीष उईके यांनी आपआपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीचे चित्र बदलेल की काय असा प्रश्न नागरीकांना पडला आहे. आज निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप झाले असुन उद्यापासुन प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात होईल. येत्या २० नोव्हेंबर ला मतदान असुन लोकं, मतदार कुणाला पसंती देतात हे अद्याप निश्चीत सांगता येणार नसल्याचे लोकांमध्ये बोलल्या जात आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
