होणारी निवडणूक रामटेककरांचे सर्व स्वप्न पूर्ण करणारे आहे – आमदार जयस्वाल
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
होणारी निवडणूक रामटेककरांचे सर्व स्वप्न पूर्ण करणारे आहे – आमदार जयस्वाल
▫️ आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पार पडला बूथप्रमुखाचा मेळावा
रामटेक / प्रतिनिधी:
येणारी निवडणुक ही रामटेककरांचे सर्व उर्वरीत स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढायची असून प्रत्येकाने त्यानुसार कामाला लागण्याचे आदेश रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार ॲड आशिष जयस्वाल यांनी दिला. आज विद्या सेलिब्रेशन सभागृहात पार पडलेल्या बूथ प्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
देवलापार येथे उमरी- बोथीया, पालोरा व पथरई व वडंबा विभागाची आज शिवसेना बूथ प्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आली होती.
मेळाव्याचे उद्घाटन आमदार ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोला पुष्पहार घालून कऱण्यात आले. यावेळी शिवसेना रामटेक तालुका प्रमुख विवेक तुरक, पंचायत समिती सभापती चंद्रकांत कोडवते, जिल्हा परिषद सदस्य संजय झाडे, युवासेना उपजिल्हा प्रमुख कमलेश शरणांगत,माजी सभापती संजय नेवारे, शिवसेना उपतालुका प्रमुख देवानंद वंजारी, युवासेना तालुका संगटक आकाश पंधरे उपस्थीत होते.
यावेळी आमदार ॲड आशिष जयस्वाल यांचे स्वागत रिजवान पठाण, सोहेल शेख, युनूस अगवान, सहादत पठाण, साजिद शेख, फयुम पठान सह देवलापार येथिल मुस्लीम बांधवांनी केले. आमदार जयस्वाल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उमरी- बोथीया पालोरा व पथरई वडंबा सर्कल येथिल कृष्णा मडावी, जयदेव कुमरे, योगेश कुमरे, अजय कुमरे, धर्मराज कुमरे, वासुदेव तुमडाम, शिशुपाल कुमरे, सुनिल उईके, अर्जुन कुमरे, नरेंद्र कोडवते, काशिनाथ मरस्कोल्हे, विशाल कोडवते सह शेकडो युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी प्रतीक डोंगरे, एकनाथ गोडबोले, रमेश ब्रह्मनोटे,सचिन कोडपे शिवसेना सरपंच देवराज इनवाते,संदीप वासनिक, आकाश वासनिक, रुपेश उईके,कल्पना भलावी, विलास कुमरे, चंद्रभान वरठी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपास्थित होते.
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space