प्रियंवदा येथे सिकलसेल आजार तपासणी शिबिर संपन्न
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
*प्रियंवदा येथे सिकलसेल आजार तपासणी शिबिर संपन्*
—————————————–
*नागपूर जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम*
*दिनांक 16.10.2024*
👇👇
*कारगाव सर्कल प्रतिनिधी :-रत्नपाल मेश्राम*
साले शहरी:-नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयांच्या निर्देशानुसार वाढत्या सिकलसेल च्या आजाराला वेळीच आळा घालून त्याला प्रतिबंधित करण्यासाठी संपूर्ण नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात तसेच प्राथमिक माध्यमिक तसेच संपूर्ण शैक्षणिक अभ्यास केंद्रात सिकलसेल आजार तपासणी तथा प्रतिबंध शिबिर अभियानाचे आयोजन ठिकठिकाणी केल्याचे दिसून येत आहे.
सदर सिकलसेल आजार तपासणी शिबिर अभियान भिवापूर तालुक्यातील प्रियंवदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सालेशहरी येथे दिनांक 15 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर या दोन दिवशीय तपासणी शिबिरात विद्यालयातील पाच ते बाराच्या सर्व विद्यार्थ्यांनी सिकल सेल आजार तपासणी करून या अभियानाचे लाभार्थी ठरले .
विद्यालयाचे प्राचार्य राजू शिवणकर सर यांच्या सूचनेनुसार प्रदीप लोखंडे सर यांच्या मार्गदर्शनात विद्यालयातील एकूण 231 विद्यार्थ्यांनी सदर शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी इयत्ता पाच ते बाराच्या सर्व विद्यार्थ्यांचे रक्ताचे नमुने घेऊन रक्तगट तथा सिकलसेल आजार तपासण्यासाठी मेवो हॉस्पिटल नागपूर इथून प्रयोगशाळा तंत्रज्ञ येडेकर मॅडम तथा सूर्यवंशी मॅडम यांना पाचारण करण्यात आले होते.
सिकलसेल तपासणी शिबिर दिनांक 16 ऑक्टोबर 2024 ला संपन्न झाल्यानंतर तपासणी अहवाल एक ते दीड महिन्यात प्राप्त होण्याची संकेत प्रयोगशाळा तंत्रज्ञाकडून प्राप्त झाले आहे हे विशेष.
सिकलसेल आजार तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील विलास तांबे सर, विनोद नन्नावरे सर, भारत शेंडे सर, रडके मॅडम, भूजाडे मॅडम, राजू सागरे सर, फुलचंद ठाकूर सर, सहारे सर, देवराव भोयर ,वामन वानखडे,मंडपे ताई आदींनी अथक परिश्रम घेतले.
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space