सालेभट्टी येथे मंढई निमित्त “जन्मदाता” या तीन अंकी नाट्य प्रयोगाचे आयोजन*
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
*सालेभट्टी येथे मंढई निमित्त “जन्मदाता” या तीन अंकी नाट्य
प्यगाचे आयोजन
—————————-
दिनांक:- 01.11.2024
*जनता टाइम्स जटा टीवी चैनल*
*इंसाफ चाहता है! इंडिया*
*कारगाव सर्कल प्रतिनिधी:- रत्नपाल मेश्राम*
*सालेभट्टी*:-भिवापूर तालुक्यातील मौजा सालेभट्टी (कारगाव पुनर्वसन )जिल्हा- नागपूर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील खास मंढईनिमित्त ध्रुव थिएटर्स सुयोग नाट्य रंगभूमी वडसा, मा. देवा शेडमाके सर द्वारा निर्मित तथा विशाल मा.तराळ -पी लालचंद द्वारा दिग्दर्शित महान सामाजिक ,कौटुंबिक ,संगीत प्रधान तीन अंकी नाट्यपुष्प “जन्मदाता” या प्रयोगाचे सादरीकरण दिनांक 3 नोव्हेंबर रोज रविवारला रात्री 9.30 वाजे होणार आहे.
सदर नाटकातील नाट्य कलावंत वासू कुमार, पी लालचंद ,के रवी कुमार, श्री कापगते, स्वर -अभिजीत शेंडे ,विकास गुरनुले ,मिस भूमिका दुपारे, मिस अस्मिता, मिस प्रीती मरसकोले, सिने. निशा घोंगडे आणि सिने. विशाल तराळ आदी प्रमुख कलाकारांच्या भूमिकेत असणार आहेत तथा संगीत साथ- राजू सहारे ,बाळू कावळे ,सुनील माहूरले यांच्या सुमधुर संगीतात मुख्य मार्गदर्शक मा.वासू कुमार, सूत्रधार के रवीकुमार ,संकल्पना रमेश मसराम यांची असणार आहे.
विशेष म्हणजे एकाच तिकिटात नाटकासोबतच लावणी डान्स ग्रुपचे सुद्धा आस्वाद घेता येणार आहे. यात लावणी डान्स ग्रुपचे प्रस्तुती नाटक सादरीकरण अगोदर रात्रीला 7.00 वाजे होणार आहे.
सदर तीन अंकी नाट्यपुष्पाचे प्रस्तुतीकरण मा. सुधाकरजी बोरकुटे सरांडी यांच्या अध्यक्षतेखाली मा. सौ छायाताई ढोणे अध्यक्ष प्रभाग संघ कारगाव सर्कल यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.
तसेच याच दिवशी दिनांक 3 नोव्हेंबर रोज रविवारला मंडई तथा जंगी दुय्यम खडा तमाशाचे उद्घाटन सकाळी 10.00 वाजे मा. डॉक्टर रामरावजी घोडेस्वार( कार्डिओलॉजिस्ट) नागपूर यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे.
या नाट्यप्रयोगाचे आस्वाद घेण्यासाठी तिकीट दर खुर्ची -120/ , बिछायत -100/ तर स्त्रिया व लहान मुलांना 70/ रुपये याप्रमाणे शुल्क आकारण्यात आले असल्याने तालुका तथा जिल्हा परिसरातील समस्त नाट्यप्रेमींनी सदर संधीचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक- संयोजक देवेंद्र देशमुख तथा नाट्य मंडळातील सहकारी मन्सारामजी सोनवाणे, देवरामजी भोयर आदींनी केली आहे.
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space