नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , नवी मुंबईकर नागरिकांचा ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमास उत्साही प्रतिसाद – जनता टाइम्स न्यूज

नवी मुंबईकर नागरिकांचा ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमास उत्साही प्रतिसाद

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

प्रशांत शहारे / विदर्भ ब्युरो चीफ

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाला नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला असून 6 हजारहून अधिक नागरिकांनी उपक्रमस्थळी भेट देत सरकारच्या व महानगरपालिकेच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती घेतली आहे व लाभ घेतला आहे.

महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली 20 जानेवारीपासून दिघा येथून ‘शासन आपल्या दारी’ अभियानास प्रारंभ झाला असून प्रत्येक ठिकाणी नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहत हा उपक्रम यशस्वी केला आहे.

आजही स्वामी विवेकानंद सांस्कृतिक भवन, सेक्टर-14,15 वाशी येथे सकाळच्या सत्रात 150 हून अधिक नागरिकांनी सहभागी होत उपक्रमाचा लाभ घेतला. समाजविकास विभागाचे उपआयुक्त तथा शासन आपल्या दारी उपक्रमाचे नमुंमपा स्तरीय नोडल अधिकारी श्री. किसनराव पलांडे यांनी नागरिकांचे आभार मानत जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत हा संदेश पोहचवून या अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या उपक्रमाचे नेटके आयोजन वाशी विभागाचे सहा. आयुक्त्‍ तथा विभाग अधिकारी श्री. सागर मोरे आणि सहकारी अधिकारी, कर्मचारी यांनी केले होते. यावेळी वैदयकीय अधिकारी डॉ. कविता बोराडे, समाजविकास अधिकारी श्री. सर्जेराव परांडे यांनी उपस्थित राहून नागरिकांना योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहीत केले.

20 जानेवारीपासून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरु झालेला शासन आपल्या दारी हा उपक्रम 6 फेब्रुवारीपर्यंत 28 ठिकाणी आयोजित करण्यात आला असून यापूर्वीच्या सर्वच ठिकाणी नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिलेला आहे.

यामध्ये 29 जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात कोपरखैरणे येथे सीबीएसई माध्यमाची नमुंमपा शाळा क्र. 94 सेक्टर 11, बोनकोडे या ठिकाणी 510 नागरिकांनी तसेच नमुंमपा शाळा क्र.36 व 37 कोपरखैरणे गाव येथे 450 हून अधिक नागरिकांनी उपस्थिती दर्शवत योजनांचा लाभ घेतला.

30 जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात नमुंमपा शाळा क्र.33 पावणे गाव येथे 202 व दुपारच्या सत्रात नमुंमपा शाळा क्र.40 महापे गाव या ठिकाणी 295 नागरिकांनी उपक्रमास्थळी उपस्थिती दर्शविली.

31 जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात तुर्भे विभाग कार्यालयातील सानपाडा येथील सभागृहात 172 जणांनी तसेच दुपारच्या सत्रात आयसीएल शाळा से.21 तुर्भे येथे 433 जणांनी लाभ घेतला.

1 फेब्रुवारी रोजी बगाडे कंपनीसमोरील मोकळी जागा इंदिरानगर तुर्भे येथे 436 नागरिक सकाळच्या सत्रात तसेच कोपरीगाव मैदान तुर्भे येथे दुपारच्या सत्रात 423 नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे.

महापालिका आयुक्त्‍ श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात आलेला शासन आपल्या दारी हा उपक्रम सर्वच ठिकाणच्या नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत यशस्वी केला असून उपक्रमांच्या आयोजनामध्ये सर्वच विभागांना समान संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्देशानुसार नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या त्रास न होता सरकारी योजनांचा लाभ थेट त्यांच्या घराजवळ मिळावा यादृष्टीने शासन आपल्या दारी हा अभिनव उपक्रम संपूर्ण राज्यात राबविला जात आहे. शासकिय योजना लोकाभिमुख व्हाव्यात व त्याची कालमर्यादीत गतीमान अंमलबजावणी व्हावी या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमास नागरिकांच्या मोठया संख्येने मिळणारा सहभागाचा प्रतिसाद हा या उपक्रमाची यशस्विता वाढविणारा आहे.

6 फेब्रुवारी रोजी या उपक्रमाची सांगता होणार असून बेलापूर विभाग कार्यक्षेत्रात सकाळी 11 ते 1 यावेळेत वारकरी भवन, सेक्टर 3 ए, सीबीडी बेलापूर येथे तसेच दुपारी 2 ते 5 या वेळेत नमुंमपा शाळा क्र.1 बेलापूर गाव उपक्रम आयोजन करण्यात आले आहे. त्यापूर्वी उदया 3 फेब्रुवारी रोजी महात्मा जोतिबा फुले सांस्कृतिक भवन, सेक्टर 3 वाशी येथे सकाळच्या सत्रात व ईटीसी शिक्षण प्रशिक्षण केंद्र से.30 ए वाशी येथे दुपारच्या सत्रात उपक्रम आयोजन होणार आहे.

4 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 1 या सत्रात नमुंमपा शाळा क्रमांक 16 शिवाजीनगर नेरुळ येथे तसेच दुपारच्या सत्रात दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत नमुंमपा शाळा क्रमांक 17 , जुईनगर येथे हा उपक्रम आयोजित केला जात आहे. 5 फेब्रुवारी रोजी नमुंमपा शाळा क्रमांक 11, से-14 कुकशेत या ठिकाणी सकाळच्या सत्रात तसेच नमुंमपा शाळा क्र.10 नेरुळ गाव येथे दुपारच्या सत्रात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा यादृष्टीने ‘योजना कल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी’ हे उद्दिष्ट घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.श्री. देवेंद्र फडणवीस व ना.श्री. अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभरात सुरू असलेल्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाला नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात नागरिकांचा उत्साही प्रतिसाद लाभत असल्याबद्दल आभार व्यक्त करीत महापालिका आयुक्त्‍ श्री. राजेश नार्वेकर यांनी जास्तीत जास्त लाभार्थी नागरिकांनी याचा उपयोग करुन घ्यावा असे आवाहन केले आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now